Last Updated: Sunday, February 3, 2013, 19:28
www.24taas.com, मुंबई मुंबई महानगरपालिकेचा २०१३-१४ अर्थसंकल्प पालिका आयुक्त सीताराम कुंटे स्थायी समितीत उद्या सादर करणार आहेत.
हा अर्थसंकल्प कोणतीही करवाढ न करणारा आणि भांडवली कामात, इन्फास्ट्रक्चर, नागरी सुविधांना प्राधान्य देणारा असेल, असा दावा मुंबईच्या महापौरानी केलायं. तसंच गेल्य़ावर्षी २६ हजार ५८१.२० कोटाच्या अर्थसंकल्पापेक्षा वाढीचा असेल अशी माहीती महापौरांनी दिलीयं.
गेल्यावेळेची अपूर्ण कामं, जेएनएनयूआरएम प्रकल्पांचा निधी आणि भांडवली कामांच्या निधीमुळे यंदाचा पालिकेचा अर्थसंकल्प तीस हजार कोटींचा असेल अशी अपेक्षा आहे.
First Published: Sunday, February 3, 2013, 19:28