मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय आस्थापनेवर भरती, Mumbai Municipal Corporation Recruitment of the medica

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लो.टि.म.स. रूग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालय आस्थापनेवरील अंतर्भुत बाळासाहेब ठाकरे ट्रामा रूग्णालयात सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील नव्याने निर्मित रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. एकूण २२ पदे भरण्यात येणार आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज केईएम रूग्णालय, परळ, नायर धर्मा. रूग्णालय, मुंबई आणि सायन रूग्णालय या रुग्णालयात उपलब्ध आहेत. अर्ज २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान कार्यलयीन वेळत मिळती. सर्व करांसहीत अर्ज ३०० रूपयांना उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013, 11:14


comments powered by Disqus