Last Updated: Monday, August 26, 2013, 15:30
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईबाप्पाचं दर्शन घ्यायचंय, मग त्यासाठी ड्रेसकोडचं पालन करा...मिनी स्कर्ट आणि लहान कपडे घालून बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जावू शकणार नाही. हा निर्णय घेतलाय ‘अंधेरीचा राजा’च्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीनं.
संकष्टीला विसर्जन होणारा गणपती अशी ज्याची ख्याती आहे, त्या ‘अंधेरीचा राजा’चं दर्शन घ्यायला आता तरुणींना आणि महिलांना ड्रेसकोडचं पालन करावं लागणार आहे. राजाचं पावित्र्य पाळलं जावं म्हणून भक्तांनी दर्शनाला येताना मिनी स्कर्ट आणि तोकडे कपडे घालून येऊ नये असं आवाहन गणेशोत्सव समितीनं केलंय.
नुकतीच ‘अंधेरीचा राजा’च्या गणेशोत्सव समितीची कार्यकारणीची बैठक झाली. त्यात यंदा सुरक्षेच्या दृष्टीनं सभामंडपात २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच २५० कार्यकर्ते जागता पहारा देणार असल्याची माहिती देण्यात आली. यंदा राजाच्या दरबारात रांजणगावचा देखावा कलादिग्दर्शक राजू सावला यांच्या संकल्पनेतून साकारला जातोय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 26, 2013, 15:30