मुंबई NSUI अध्यक्ष सापडला `न्यू़ड डान्स` करताना, Mumbai NSUI chief caught dancing naked, suspended

मुंबई NSUI अध्यक्ष सापडला `न्यू़ड डान्स` करताना

मुंबई NSUI अध्यक्ष सापडला `न्यू़ड डान्स` करताना
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एनएसयूआयच्या मुंबई अध्यक्ष सूरज ठाकूर. जनरल सेक्रेटरी विकी वटकर आणि हितेंद्र गांधी यांना पार्टीने त्यांच्या पदावरून निलंबित केलं आहे. रात्री अडीच वाजता ‘वूड रिसॉर्ट’ च्या वरील मजल्यावर आपत्तीजनक अवस्थेत एनएसयूचा अध्यक्ष सूरज ठाकूर आणि इतरांना डान्स करताना पाहिले.

सुरेश शर्मा या त्यांच्या कार्यकर्त्यांनेच सूरज ठाकूर याच्याबद्दल तक्रार केली. आणि त्यानेच त्याबाबात पार्टीकडे तक्रारही दाखल केली. त्यामुळे ही गोष्ट राहुल गांधींपर्यंत पोहचली. आणि त्यांनी तात्काळ एनएसयूआयच्या तिघांनाही निलंबित केलं.

एप्रिलमधील १४ तारखेला मुंबईतील कांदिवली मध्ये झालेल्या एनएसयूआयच्या शिबीरात ही घटना घडली होती. तिघांनी आपत्तीजनक स्थिती डान्स केला होता. आणि त्यानंतर त्यांच्या ह्या डान्सचा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. मात्र काही दिवसानंतर हा व्हिडिओ तेथून डिलीट करण्यात आला.

First Published: Tuesday, May 7, 2013, 15:55


comments powered by Disqus