Last Updated: Thursday, June 12, 2014, 09:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईचोरीच्या गुन्हा प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या चारपैकी अग्नेलो वल्दारीस या आरोपीचा कोठडीत मृत्यू झालाय. तर त्याच्या मित्रांवर लैंगिक अत्याचार झालाय.
या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतलीये. या प्रकारासाठी जबाबदार पोलिसांना पाठिशी घालण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले. या प्रकरणी संबंधित नऊ पोलिसांवर गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी करावी आणि स्वत: महासंचालकांनी या तपासावर देखरेख ठेवावी, असे आदेश न्यायालयाने दिलेत.
रेल्वे पोलीसांबाबत काय बोलायच अशा शब्दात न्यायालयानं रेल्वे पोलीसांकडून आरोपींवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मत मांडलं. शिवाय अशा पोलीसांना पाठीशी घालणा-या अधिका-यांवरही कारवाई केली जावी असं न्यायालयानं सागितलं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 08:11