मुंबई पोलीस टॉपवर... पण, पैसे खाण्यात!, mumbai police department topping the corruption chart list o

मुंबई पोलीस टॉपवर... पण, पैसे खाण्यात!

मुंबई पोलीस टॉपवर... पण, पैसे खाण्यात!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अॅन्टी करप्शन ब्युरोनं मागच्या एका महिन्यात मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना लाचखोरी करताना रंगेहात पकडलंय. यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडालीय. यामुळेच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या सगळ्याच अधिकाऱ्यांना हे प्रकरण गंभीरतेनं घेण्याचं आणि आपल्या सहकाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश दिलेत.

आत्तापर्यंत, पोलिसांचा दरारा आणि हायटेक पोलीस म्हणून मुंबई पोलिसांची गणती होत होती. परंतु, आता हेच मुंबई पोलीस लाचखोरीच्या बाबतीत सगळ्यांना वरचढ ठरलेत. लाच घेण्याच्या प्रकरणांत अटक करण्यात आलेल्यांपैकी मुंबई पोलीस टॉप लिस्टमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पवई पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सोनन चौधरी, आर्थर रोड जेलचे सुपरिटेंडंट वासुदेव वर्खुले, दिंडोशी पोलीस स्टेशनचे सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर जयवंत माने यांना एका आरोपीकडून प्रकरण दाबण्यासाठी 4.90 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणांत स्वत: पोलीस आयुक्तांनीच आता लक्ष घातलंय. जर एखादा सीनिअर इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर किंवा त्यापेक्षा खालच्या हुद्द्यावर काम करणारा पोलीस कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात पकडला गेला तर त्याच्यासोबतच अॅडिशनल कमिशनरलाही याबद्दलचा जाब विचारण्यात येईल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 13:03


comments powered by Disqus