‘समुद्रा’ बारवर पोलिसांचा छापा, २२ मुलींना पकडलंMumbai - police raid on the `Samudra` bar, 22 girls

‘समुद्रा’ बारवर पोलिसांचा छापा, २२ मुलींना पकडलं

‘समुद्रा’ बारवर पोलिसांचा छापा, २२ मुलींना पकडलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या नागपाडा इथल्या ‘समुद्रा’ या बारवर छापा मारून पोलिसांनी देहविक्रीचा धंदा करणाऱ्या २२ मुलींना अटक केलीय. पोलिसांच्या या विशेष कारवाईत २२ मुलींसह इतर ३९ जणांना पकडण्यात आलं.

समुद्रा नावाच्या एका बारमध्ये मुलींचा अश्लिल डान्स सुरू असून देहविक्रीचाही प्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना एका एनजीओनं दिली होती. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशातल्या पोलिसांचा सापळा रचून इथं छापा मारला. २२ मुलींसह १५ ग्राहक, १३ वेटर आणि एका मॅनेजरला रंगेहात पकडलंय.

पोलिसांनी याआधीही समुद्रा बारवर छापा मारला होता. मात्र त्यावेळी मुली गायब झालेल्या असायच्या. मात्र यावेळी पोलिसांनी आपल्या खबऱ्यांच्या मार्फत सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. आणि कारवाई तडीस नेली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 12:51


comments powered by Disqus