Last Updated: Wednesday, November 21, 2012, 18:29
www.24taas.com, मुंबईक्रुरकर्मा कसाबला गुप्तपणे फाशी देण्यावरून सरकारवर प्रश्नांचा भडीमार होत असताना मुंबई पोलिसांनी भविष्यात कोणत्या प्रकारच्या वादाला तोंड देण्यासाठी कसाबच्या फाशीच्या प्रक्रियेचा संपूर्ण व्हिडिओ तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कसाबला दोन दिवसांपूर्वी पुण्यातील येरवडा जेलमध्ये गुप्तपणे हलविण्यात आले होते. यावेळी त्याला आर्थर रोड जेलमधून येरवडा जेलमध्ये नेण्याचा, फाशी देण्याचा आणि दफन करण्याचा व्हिडिओ बनविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. भविष्यात यावरून काही वाद झाला तर त्याचा सामना करण्यासाठी हा व्हिडिओ बनविण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानने या संदर्भात पुरावे मागितले तर त्यांना पुरावा म्हणून हा व्हिडिओ देण्यात येऊ शकतो.
First Published: Wednesday, November 21, 2012, 18:29