गोव्यातून सहा सट्टेबाज अटक, आता शोध `व्हिक्टर`चा! Mumbai Police searching `Victor` for Fixing

गोव्यातून सहा सट्टेबाज अटक, आता शोध `व्हिक्टर`चा!

गोव्यातून सहा सट्टेबाज अटक, आता शोध `व्हिक्टर`चा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गोव्यातून सहा सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली आहे. कांदोळी भागातल्या एका खासगी बंगल्यात सट्टा चालायचा. कलंगुट पोलिसांनी बंगल्यावर धाड टाकून सट्टेबाजांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लॅपटॉप आणि 40 हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आलेत.

आयपीएल फ़िक्सिंग प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली आणि मुंबई पोलीस विक्टर नावाच्या एका हॉटेल मालकाच्या शोधात आहेत. हा व्हिक्टरच श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण, विंदू सिंग तसंच संजय जयपुर, पवन जयपुर आणि चंद्रेश जैन उर्फ जुपिटर या बुकींच्या मुंबई मुक्कामाची व्यवस्था करायचा. व्हिक्टरचं जुहूमध्ये थ्री स्टार हॉटेल आहे.

श्रीशांतचा मित्र जीजू जनार्दन, अंकित आणि चंडिला यांच्यासाठी व्हिक्टरनं १३ ते १७ मे या काळात बीकेसीमधल्या सोफीटेल या ५ स्टार हॉटेलमध्ये रूम नंबर १२१३ आणि १२१४ बुक केल्या होत्या. त्याचं ५८ हज़ार रुपयांचं बिलही विक्टरनंच अदा केलं होतं. गुरुनाथ मय्यपनच्या मुंबईत राहण्याचा खर्चही व्हिक्टरच करत असल्याचं स्पष्ट झालंय. त्याच्या हॉटेलची एक रूम क़ायमस्वरूपी विंदूच्या नावावर बुक असायची.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 27, 2013, 17:44


comments powered by Disqus