Last Updated: Monday, April 15, 2013, 17:24
www.24taas.com, मुंबईमहाराष्ट्रातील प्रमुख शहरं असलेल्या मुंबई आणि पुण्यात महिला दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
गेल्या जानेवारी महिन्यात अशा प्रकारे हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर संघटनांनी दिली असल्याची माहीत पाटील यांनी दिली. पाकिस्तानात महिलांचे आत्मघातकी पथके तयार केली जात आहेत. दहशतवादी मुलांनंतर आता महिलांना दहशतवादी हल्ले करण्याचे प्रशिक्षण देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्कार्फ घालणाऱ्या महिलांवर पोलिस नजर ठेऊन आहे. तसेच राज्यातील स्टँडर्ड ऑपरेशन स्टिटिम मजबूत असल्याची माहिती आर. आर. पाटील यांनी सांगितली.
First Published: Monday, April 15, 2013, 17:20