मुंबईत बारवर छापा, १९ बारबाला अटकेत, mumbai raid in bar

मुंबईत बारवर छापा, १९ बारबाला अटकेत

मुंबईत बारवर छापा, १९ बारबाला अटकेत
www.24taas.com, मुंबई

मुंबईत डान्सबारवर राजरोसपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. क्राइम ब्रँचच्या समाजसेवा शाखेने आपली धडक कारवाई सुरू ठेवली आहे. बुधवारी रात्री बोरिवली येथील पार्कसाइट बार ऍण्ड रेस्टॉरंट तसेच वांद्रे येथील शिशा हॉटेलवर छापा मारला. या कारवाईत १९ बारबालांसह ७४ जणांना अटक करण्यात आली. तसेच रोख रक्कम १ लाख ९२ हजार रुपये जप्त करण्यात आले.

बारमध्ये १९ बारबाला आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी मॅनेजर, कॅशियर, वेटर, बारबाला, ग्राहक अशा ७४ जणांना अटक केली. अधिक तपास कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.

वांद्रे लिंक रोडवरील शॉपर स्टॉपच्या सातव्या मजल्यावर असलेल्या शिशा हॉटेलवरदेखील पोलिसांनी छापा टाकला. यावेळी हुक्का ओढताना आढळला नसला तरी त्यासाठीचा परवाना नव्हता. तसेच परवानगीशिवाय डीजे लावल्याचे आढळून आल्याचे फिरोज पटेल यांनी सांगितले.

First Published: Friday, September 28, 2012, 11:47


comments powered by Disqus