मुंबई लोकलचे नवे तिकीटदर, Mumbai local, railway

मुंबई लोकलचे नवे तिकीटदर

मुंबई लोकलचे नवे तिकीटदर
www.24taas.com,मुंबई

मुंबई लोकलच्या नव्या तिकीटदरात आता ३३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भाडेवाढ निर्णयाबद्दल प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नव्या भाडेवाढीनुसार सेकंड क्लासचे चार रुपयांवरून पाच रूपये तर फर्स्ट क्लासचे किमान तिकीट ४५ रुपयांवरून ५० रुपयांवर गेले आहे. २२ जानेवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून नवीन दरपत्रक जाहीर झालेय. त्यानुसार उपनगरीय लोकल मार्गावरील फर्स्ट आणि सेकंड क्लासच्या दैनंदिन तिकिटातील मूळ रक्कम जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मासिक आणि तिमाही पासाविषयीच्या दरांच्या सूत्रांविषयी अद्याप माहिती दिली नसल्याने गोंधळ कायम आहे.

गतवर्षी रेल्वे मंत्रालयाने केलेली वाढ, त्यानंतर केंद्र सरकारने आकारलेला सुमारे चार टक्क्यांचा सेवाकर, त्यात राज्याचा अधिभारानंतर पुन्हा नवी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. या नव्या वाढीत ६, ११, २१ रुपयांपुढील रक्कम अनुक्रमे १०, १५, २५ आकारण्यात येणार आहे. त्यामुळे मधल्या अंतरावरील प्रवाशांवर जादा भार पडणार आहे.

२२ जानेवारीनंतरच्या आरक्षित तिकिटांवर भाडेवाढ लागू होणार आहे. तसेच २२ जानेवारीनंतर मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांकडून भाडेवाढीची जादा रक्कम वसूल केली जाणार आहे.
मुंबई लोकलचे नवे तिकीटदर

मुंबईतील भाडेवाढ अशी असेल

मध्य रेल्वे ( सेकंड क्लास)

सीएसटी-भायखळा - ५ रु.
सीएसटी-दादर - ५ रु.
सीएसटी-कुर्ला - १० रु.
सीएसटी-घाटकोपर - १० रु.
सीएसटी-ठाणे - १५ रु.
सीएसटी-डोंबिवली - २० रु.
सीएसटी-कल्याण - २० रु.
सीएसटी-अंबरनाथ - २० रु.
सीएसटी-कर्जत - २५ रु.
सीएसटी-कसारा - ३० रु.
सीएसटी-खोपोली - ३० रु.
सीएसटी-पनवेल - २० रु.
सीएसटी-वाशी - १५ रु.
सीएसटी-बेलापूर - १५ रु.

मध्य रेल्वे , फर्स्ट क्लास
सीएसटी-भायखळा - ५० रु.
सीएसटी-दादर - ५० रु.
सीएसटी-कुर्ला - ९० रु.
सीएसटी-घाटकोपर - ९० रु.
सीएसटी-ठाणे - १२० रु.
सीएसटी-डोंबिवली - १४० रु.
सीएसटी-कल्याण - १४५ रु.
सीएसटी-कर्जत - १९५ रु.
सीएसटी-कसारा - २१० रु.
सीएसटी-खोपोली - २०५ रु.
सीएसटी-वाशी - १२५ रु.
सीएसटी-पनवेल - १४५ रु.
मुंबई लोकलचे नवे तिकीटदर

पश्चिम रेल्वे , फर्स्ट क्लास

चर्चगेट-मुंबई सेंट्रल - ५० रु.
चर्चगेट-दादर - ५० रु.
चर्चगेट-बोरिवली - १२० रु.
चर्चगेट-वसई - १४५ रु.
चर्चगेट-विरार - १४५ रु.

पश्चिम रेल्वे , सेकंड क्लास
चर्चगेट-मुंबई सेंट्रल - ५ रु.
चर्चगेट-दादर - ५ रु.
चर्चगेट-बोरिवली - १५ रु.
चर्चगेट-वसई - २० रु.
चर्चगेट-विरार - २० रु.

First Published: Wednesday, January 16, 2013, 10:35


comments powered by Disqus