हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, Mumbai, railway, local

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
www.24taas.com , मुंबई

वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सायंकाळी चार वाजता ही घटना घडली.

वाशी-सीएसटी लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बर मार्गावरून सीएसटीकडं जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी नाही.

चाकरमान्याच्या घरी परतण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवासी खोळबंले आहेत. मध्य रेल्वेकडून लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

First Published: Tuesday, March 5, 2013, 17:20


comments powered by Disqus