Last Updated: Tuesday, July 23, 2013, 14:05
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकेंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारनं एसी रेस्टॉरंटवर लादलेल्या सर्व्हिस टॅक्सच्या विरोधात परळमधील आदिती हॉटेलच्या मालकानं उपरोधिक टीका केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलच बंद पाडलं.
हॉटेलमालकानं बिलावरच शेलक्या शैलीत यूपीए सरकारचे वाभाडे काढलेत. 'यूपीए सरकारच्या धोरणानुसार पैसे खाणं ही गरज बनलीय, तर एसी हॉटेलमध्ये जेवणं ही चैनीची बाब झालीय' अशी कमेंट हॉटेल मालकानं चक्क हॉटेलच्या बिलावरच प्रिंट केलीय. ही बोचरी टीका सहन न झाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे हॉटेल बंद पाडलंय.
केईएम हॉस्पिटलच्या नेमकं समोर असलेलं हे आदिती हॉटेल श्रीनिवास शेट्टी यांच्या मालकीचं आहे. 'स्वतंत्र भारतामध्ये मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. यूपीए सरकारच्या धोरणामुळं मला हॉटेलमधील एसी विभाग बंद करावा लागला. म्हणूनच या मार्गानं मी विरोध नोंदवला', असं सांगत शेट्टींनी आपल्या कृतीचं समर्थन केलंय. याबाबत नरेंद्र मोदींनीही ट्विट केल्यानं आगीत तेल ओतलं गेलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 23, 2013, 13:46