Last Updated: Monday, June 3, 2013, 12:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई डबेवाल्यांची कीर्ती साता समुद्रपार पसरलेली असताना आता त्यांचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी दुबई सरकारही सरसावले आहे. दुबईमध्ये ४ आणि ५ जून रोजी गल्फ को-ओपरेशन परिषद आयोजित करण्यात आलीय.
या परिषदेला मुंबई टिफीन बॉक्स स्पलायर्स ट्रस्टचे प्रवक्ते अरविंद तळेकर यांना आमंत्रित करण्यात आलंय. तळेकर या परिषदेमध्ये तब्बल ५ हजार डबेवाल्यांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंट आणि मुंबईकरांना कशापद्धतीनं ही सुविधा डबेवाले पुरवतात याबाबतच मार्गदर्शन या डबेवाल्यांकडून केलं जाणारय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 3, 2013, 12:43