मुंबईत महिला असुरक्षितच? रोज १ बलात्कारMumbai safe? 229 rapes, 8 gangrapes recorded in 8 months

मुंबईत महिला असुरक्षितच? रोज एक बलात्कार

मुंबईत महिला असुरक्षितच? रोज एक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे, असा आतापर्यंतचा आपला समज होता... पण आता तो खोटा ठरलाय... माहिती अधिकारामधून जी आकडेवारी समोर आली, ती चक्रावून टाकणारी आहे...

आकडेवारीनुसार मुंबईमध्ये रोज एक बलात्कार, मुंबईत दर महिन्याला एक गॅंगरेप होतोय. मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे का? याचं हे उत्तर माहितीच्या अधिकारातून समोर आलंय.

यावर्षी दर महिन्याला मुंबईत एक गँगरेप झालाय. तर आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन मुंबईत रोज एक बलात्कार होतोय. दिल्ली गँगरेप आणि शक्तीमिल गँगरेपनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरही मुंबईत दर महिन्याला एक गँगरेप होतोय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवल्यावर धक्कादायक खुलासा झालाय.

गेल्या ११ महिन्यात मुंबईत ११ गँगरेप झालेत. २००८ साली मुंबईत ८, २००९ साली ९ तर २०१० साली ७ गँगरेप मुंबईत झाले होते.

महिन्याला एक गँगरेप ही बाब धक्कादायक आहेच पण, मुंबईत दिवसाला एक बलात्कार हे तर त्यापेक्षाही धक्कादायक आहे. मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे, अगदी रात्री बारा वाजेपर्यंत मुली एकट्या फिरू शकतात, असं अभिमानानं सांगितलं जायचं... पण या सगळ्या आकडेवारीनं हे खोटं ठरवलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 13:49


comments powered by Disqus