मुंबई पुन्हा हादरली: गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेपMumbai- Six men gang-rape 16-yr old

मुंबई पुन्हा हादरली: गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप

मुंबई पुन्हा हादरली: गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

महिला पत्रकारावरील गँगरेप प्रकरणाला दोन महिनेही पूर्ण होत नाही, तो मुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलीय. मुंबईतल्या गोरेगाव परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी गँगरेप केल्याची घटना भर दिवाळीत घडलीय.

ते नराधम पीडित तरुणीच्या परिचयाचेच असल्याचं पुढं आलंय. दिवाळीच्या पूजेत सहभागी होण्यासाठी मुलीला आपल्या घरी घेऊन जातो, असं सांगत तिला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी संध्याकाळची ही घटना आहे. सर्व आरोपींविरोधत दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दिल्ली गँगरेपनं संपूर्ण देश हादरला होता. तिच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली. तर मुंबईत २२ ऑगस्टला महिला फोटोग्राफरवरील गँगरेपची घटना अजून ताजीच आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 4, 2013, 10:48


comments powered by Disqus