मुलासाठी ३ बहिणींवर आत्याच्या पतीचा बलात्कार, MUMBAI SHAMED: Aunt forces minors to have sex with her

मुलासाठी ३ बहिणींवर आत्याच्या पतीचा बलात्कार

मुलासाठी ३ बहिणींवर आत्याच्या पतीचा बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन बहिणींनी आपल्या आत्याच्या नवऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. पीडित बहिणींनी दिलेल्या तक्रारी नुसार आत्याला एकही मुलगा नव्हता.

मुलाच्या इच्छेमुळे आत्याच्या नवऱ्याने गेल्या सात महिन्यांपासून या मुलींवर बलात्कार करीत होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे या लांच्छनास्पद कृत्य करण्यास त्यांची आत्याच मुलींना तयार करून पतीकडे पाठवत होती. या तिन्ही बहिणींनी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

आत्याने मुलींना फसवले, आत्या सांगायची असे केल्यास तुमची उंची वाढेल. पीडित अल्पवयीन मुलींचे वय अनुक्रमे १७, १५ आणि १३ वर्ष आहे. या तिन्ही बहिणी ओशिवारा येथील आपल्या आत्यांच्या नवऱ्याच्या घरी राहत होत्या. मूळच्या बिहारमधून आलेले हे कुटुंबिय मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून राहते आहे. या तिन्ही मुली आपल्या आत्येच्या घरी दोन लहान मुलींना सांभाळत होत्या.

मुलगा होत नसल्याने आत्या आणि तिच्या नवऱ्याने हे घृणास्पद कृत्य केलं. आत्या एकानंतर एक या तीन मुलींना नवऱ्याच्या हवाली करीत होती. सुरूवातीला तीने सांगितले की, या मुळे तुमची हाइट वाढेल, तुम्ही सुंदर दिसाल आणि चांगल्या घरात तुमचे लग्न होईल. नंतर सांगितले की मला मुलगा हवा आहे. मुलींनी विरोध केल्यावर त्या मुलींना मारत असल्याचेही तक्रारीमध्ये नोंदविले आहे. एकदा लहान बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओही आत्याने बनविला होता.

ब्ल्यू फिल्म दाखवत होती आत्या
पीडित मुलींनी सांगितले, की आत्या नवऱ्याकडे पाठविण्यापूर्वी आम्हांला ब्ल्यू फिल्म दाखवत होती. स्वतःपण दारू पित होती आणि आम्हांलाही दारू पाजण्यासाठी दबाव टाकत हेती. तसेच कोणाला न सांगण्याची धमकी देत होती. एके दिवशी लहान बहिण आपल्या वडिलांना भेटायला गेली तेव्हा तिने सर्व प्रकरण वडिलांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 9, 2014, 17:27


comments powered by Disqus