मुंबई दहशतवादी हल्ला: सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल Mumbai Terrorist Attack: Supplementary Chargesheet

मुंबई दहशतवादी हल्ला: सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल

मुंबई दहशतवादी हल्ला: सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल
www.24taas.com, मुंबई

26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केलीय. अबु जिंदालचा ह्या दहशतवादी हल्लात काय रोल होता, कसा प्रकारे आयएसआय आणि पाकिस्तान आर्मीने या दहशतवादी हल्ल्याला पाठींबा दिला या बाबींचा उल्लेख पोलीसांनी या चार्जशीटमध्ये केलाय...14 हजार 667 पानांचा या चार्जशीटमध्ये 783 साक्षीदार आहेत तर एकूण 12 आरोपींना फरार दाखवण्यात आलं आहे...

दहशतवादी हल्ल्याचा वेळी उभारण्यात आलेल्या कंट्रोल रुमची माहिती लोकल पोलिसांनी होती. पाकिस्तानी सेनेच्या मदतीनं टेरर कॅम्प मुज्जफराबाद मध्ये चालवले जात होते.26/11 च्या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर पाकिस्तानावर दबाव वाढल्यानंतर टेरर कंट्रोल रुमवर पाकिस्तानी गुप्तचर विभागाने छापा टाकलं होतं.

मात्र, या कंट्रोल रुमवर रेड होणार असल्याची माहिती स्वतः गुप्तचर विभागाचा अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना दिलं होतं.. आयएसआयनेचा एका मेजर रँकच्या अधिकाऱ्यानेच या दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आलेल्या स्फोटकांचा साठा दिला होता..

First Published: Tuesday, October 16, 2012, 23:27


comments powered by Disqus