अतिरीक्त पोलीस महासंचालकांचा आत्महत्येचा प्रयत्न! Mumbai top cop sets himself ablaze, battling for life in hospital

अतिरीक्त पोलीस महासंचालकांचा आत्महत्येचा प्रयत्न!

अतिरीक्त पोलीस महासंचालकांचा आत्महत्येचा प्रयत्न!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अतिरीक्त पोलीस महासंचालक रणजीतकुमार सहाय यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मुंबईतल्या मलबार हिल येथील निवासस्थानी सहाय यांनी स्वत:ला पेटवून घेतलंय.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सहाय ६० टक्के भाजले आहेत. या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सहाय १९८६ च्या बँचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळामध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.

त्यावेळी MSRTC च्या गैरकारभारावर त्यांनी बोट ठेवलं होतं. त्याची तक्रारही त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर MSRTC चे एमडी दीपक कपूर यांची चौकशीही झाली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 15, 2013, 19:35


comments powered by Disqus