विद्यार्थ्यांचा पैसा मुंबई कुलगुरुंच्या वकिलांवर खर्च , Mumbai University Vice-Chancellor spent by the lawyer

विद्यार्थ्यांचा पैसा मुंबई कुलगुरुंच्या वकिलांवर खर्च

विद्यार्थ्यांचा पैसा मुंबई कुलगुरुंच्या वकिलांवर खर्च
www.24taas.com,मुंबई

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर राजन वेळुकर वकिली खर्चामुंळ चर्चेत आलेत. नियुक्तीला आव्हान देणा-या याचिका चालवण्यासाठी तीन वकिलांवर कुलगुरुंनी तब्बल ४ लाख ११ हजारांचा खर्च केलाय.

विद्यापीठाच्य़ा वकिलांचे पॅनल असतानाही वेळुकर यांनी खासगी वकिलांना नियुक्त केलयं. माहितीच्या अधिकाराखाली ही धक्कादायक माहिती समोर आलीये. वेळुकर यांच्या नियुक्तीला आव्हान देणा-या तीन वेगवेगळ्या याचिका कोर्टात दाखल आहेत.

या याचिकांवर प्रतिवाद करण्यासाठी विद्यापीठात वकिलांचं एक पॅनल आहे. कुलगुरुंनी या पॅनलवर विश्वास न दाखवता या याचिका चालवण्यासाठी खासगी वकिलांची नियुक्ती केली. या वकिलांच्या फी पोटी त्यांना ४ लाख ११ हजार रुपये फी देण्यात आलीये.

विद्यार्थ्यांसाठीचा पैसा कुलगुरुंच्या न्यायालयीन प्रकरणासाठी का खर्च केला जातोय असा सवाल उपस्थित केला जातोय.

First Published: Tuesday, February 12, 2013, 16:42


comments powered by Disqus