Last Updated: Friday, August 24, 2012, 09:09
www.24taas.com,मुंबईमुंबईत ११ ऑगस्ट रोजी करण्यात आलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, असं आता पोलिसांनी म्हटलं आहे. हिंसाचाराचे हे षड्यंत्र कसे रचले गेले, याची माहिती पोलीस काढत आहेत.
मुंबईतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता, असे स्थानिक न्यायालयाला पोलिसांनी सांगितले. याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. हिंसाचाराप्रकरणी आणखी १७ संशयित आरोपींना गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ४८ लोकांना अटक केली आहे.
आसाम आणि म्यानमार येथे झालेल्या हिंसाचाराचा धागा पकडत रजा अकादमीने मोर्चा काढला होता. यावेळी मुंबईत हिंसाचार घडवून आणल्याचा आता पोलिसांनी दावा केला आहे. या हिंसाचारात दोन युवकांचा मृत्यू झाला तर ४४ पोलीस आणि ५२ लोक जखमी झाले होते. त्यामुळे याप्रकरणी आता कोणाला शिक्षा होती याकडे लक्ष लागले आहे.
First Published: Friday, August 24, 2012, 09:09