Last Updated: Friday, September 14, 2012, 08:51
www.24taas.com, मुंबईमुंबईत सीएसटीवर ११ ऑगस्ट रोजी मोर्चादरम्यान हिंसाचार झाला होता. त्या मोर्चामध्ये प्रक्षोभक भाषण केलेल्या वक्त्यांनी परदेशी दौरा केल्याचं उघड झालं आहे.
आखाती देशांसह पाकिस्तानचा दौराही केल्याचं उघड झालं आहे. सीएसटी हिसंचाराचा आणि त्यांच्या परदेशी दौ-याचा काही संबंध आहे का याचा पोलीस तपास घेत आहेत.
सीएसटी हिंसाचारात परदेशी शक्तींचा हात असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. त्याचबरोबर दाऊद इब्राहीमचा यामागे हात आहे का? अशीही चर्चा सुरू आहे.
First Published: Friday, September 14, 2012, 08:47