Last Updated: Thursday, November 28, 2013, 09:37
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपश्चिम रेल्वे २८ तारखेला म्हणजे गुरुवारी १५० वर्षात पदार्पण करत आहे. २८ नोव्हेंबर १९६४ ला सुरत ते ग्रॅट रोड अशी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली ट्रेन धावली होती. तेव्हा १५० वर्षाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने दोन दिवस चर्चगेट रेल्वे स्थानकावर अत्यंत दुर्मिळ अशा छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
पश्चिम रेल्वेचं पूर्वीचं नाव होतं बीबीसीआय म्हणजे बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे. या बीबीसीआयची १८५५ ला स्थापना झाली आणि १८५९ ला सूरत - मुंबई रेल्वे मार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली. अनेक अडथळ्यावंर मात करत अखेर हा मार्ग पूर्ण झाला. २८ नोव्हेंबर १८६४ ला सूरत ते ग्रॅट रोड अशी रेल्वे धावली आणि इंग्रजांचं आणखी एक सत्ता केंद्र असलेलं मुंबई-बडोदा संस्थान जोडलं गेलं. यामुळे मुंबई - उत्तर भारत जोडण्याचा मार्गही मोकळा झाला. मुंबईत त्यावेळी चर्चगेट, मुंबई सेंट्रल किंवा दादर अशा स्थानकांना महत्व नव्हतं. त्यावेळी महत्व होतं ते ग्रॅट रोडला.
पश्चिम रेल्वेला दीडशे वर्षं पूर्ण झाल्या निमित्तानं अत्यंत दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन चर्चगेट स्थानकावर भरवण्य़ात आलंय. जुनं चर्चेगट, कुलाबा चर्चगेट दरम्यान धावणारी रेल्वे, चर्चगेट स्थानकावरुन दिसणारं ब्रेबॉन स्टेडियम, केनेडी यांच्या पत्नी जॅकलिन केनेडी यांनी पश्चिम रेल्वेला दिलेली भेट असे अनेक फोटो यामध्ये पाहायला मिळतायत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. फोटोफीचर पश्चिम रेल्वेचा छायाचित्रातून इतिहास
First Published: Thursday, November 28, 2013, 08:05