Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:19
www.24taas.com, मुंबईमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याचे कळताच मुंबईतील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या फाशीचे स्वागत केले आहे.
अखेर चार वर्षांनी का होईना आपल्याला न्याय मिळाला असल्याची भावना प्रत्येक मुंबईकरांचा मनात आहे. दक्षिण मुंबईसह इतर ठिकाणी फाटके वाजवून मुंबईकरांनी या फाशीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांनी कसाबच्या फोटो जाळून ही बातमी साजरी केली आहे.
First Published: Wednesday, November 21, 2012, 09:36