Last Updated: Monday, October 21, 2013, 18:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू, काहीही झालं तरी एटीएम तुटणार नाही, महायुती अभेद्यच राहील’ असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणालेत.
मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ट्रॉमा सेंटरचं उदघाटन झालं. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आरपीआय नेते रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी आठवले-ठाकरे-मुंडे हे एटीएम तुटणार नाही, असं मुंडे यांनी म्हटलंय.
‘एटीएम तुटणार नाही, फुटणार नाही उलट विजयी होणार आहे... रविंद्र वायकर य़ांना एक सांगायचंय की, रामदासजींना तुमच्या सिनेमात काम करायचं असेल तरी ते देऊ नका, कारण आम्हाला त्यांना दिल्लीत बसवायचंय, महाराष्ट्रात बसवायचंय. आपल्या तिघांच्या एकीचा झेंडा फडकणं जास्त महत्त्वाचं आहे’ असं बोलत मुंडे यांनी रामदास आठवले यांना नकळत आणखी काही स्वप्न दाखवलीत हे मात्र खरं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 21, 2013, 18:44