मोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`? Munde to Modi`s support

मोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?

मोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?
www.24taas.com, मुंबई

नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

भाजप हा मोठा पक्ष असल्यानं पंतप्रधान कोण होणार, हे तो पक्षच ठरवेल. याबाबत नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांची कालच भेट झाल्याचं मुंडे म्हणाले. नरेंद्र मोदींसाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं जगजाहीर आहे. आता मुंडेंसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मुंडेंसाठी बॅटिंग सुरू केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



मोदींना एनडीएमध्ये नीतिश कुमारांचंच आव्हान आहे. त्यामुळे एनडीएमध्ये नेमका पंतप्रधानपदाचा दावेदार कोण ठरेल, यावर चर्चा रंगली आहे. मात्र गोपीनाथ मुंडेंनी नरेंद्र मोदींची बाजू घेऊन मोदींची बाजू बळकट केली आहे.

First Published: Sunday, April 14, 2013, 17:14


comments powered by Disqus