Last Updated: Wednesday, October 16, 2013, 16:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईजोगेश्वरी पूर्व येथील संजय गांधी नगर परिसरात रात्री दहा जणांच्या टोळीने दोघांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत एका तरूणाला भोसकले. विनोद सावंत (२८) या तरूणावर तलवार आणि चॉपरने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
विनोद हा मध्यरात्री मनोज पुजारी आणि संजय पाटील यांच्याबरोबर जात होता. यावेळी सुधीर बारवा, संदीप बारवा, कृष्णा, अजय, विजय जाधव यांच्यासह अन्य पाच जणांनी त्याच्यावर तलवार आणि चॉपरने हल्ला केला. यावेळी मध्ये पडणाऱ्या मनोज आणि संजय यांनाही या टोळी मारहाण केली.
या मारहाणीत जखमी झालेल्या विनोदला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार होण्याआधीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर दोघा जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संदीप आणि विजय यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 16, 2013, 16:27