Last Updated: Tuesday, January 7, 2014, 13:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनवी मुंबईत दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर लग्नासाठी मागे लागलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केलीय.
गणेश सुर्यवंशी असे या प्रकरणातल्या आरोपीचे नाव असून तो चेंबूरमध्ये ट्रॅव्हल एजंटचे काम करतो. गणेशचे संबंधित युवतीशी दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते.
युवतीनं लग्नास नकार दिल्यामुळे गणेशनं तिच्या घरात तिची हत्या केली. या हत्येनंतर गणेश स्वत:हून सीबीडी पोलीसांच्या स्वाधीन झालाय. मुंबई आणि उपनगरांत एकतर्फी प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्याचं प्रमाण वाढलं आहे.
सीबीडी सेक्टर ३ मध्ये ही मुलगी तिच्या बहिणीसोबत राहत होती. डी वाय पाटील महाविद्यालयात ती दुसऱ्या वर्षाला शिकत होती, अशी माहिती उपायुक्त परिमंडळचे अधिकारी पुरुषोत्तम कराड यांनी दिलीय
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 7, 2014, 13:25