धक्कादायक: घाटकोपरमध्ये बलात्कार करुन महिलेची हत्याmurder on 55 years old women after Rape in Ghatko

धक्कादायक: घाटकोपरमध्ये बलात्कार करुन महिलेची हत्या

धक्कादायक: घाटकोपरमध्ये बलात्कार करुन महिलेची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नववर्षाचा पहिला दिवसच बलात्काराच्या घटनेनं हादरून गेलाय. मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम भागात एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टेम करवल्यानंतर हे निदर्शनास आलंय की महिलेवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आली.

याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. ललिता राव (५५) असं या महिलेचं नाव असून ती कचरावेचक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बुधवारी सकाळी घाटकोपर लिंक रोड इथं बेवारस अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या कपाळावर जखमी होत्या. त्यामुळं दगडावर डोकं आपटून तिचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता सुरुवातीला पोलिसांनी व्यक्त केली होती. परंतु, पोस्टमार्टेम रिपोर्टनूसार या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं सिध्द झालंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 1, 2014, 22:21


comments powered by Disqus