इस्लाम कबूल करा, माथेफिरूची विमानात दहशत, muslim man try to high jack plane

इस्लाम कबूल करा, माथेफिरूची विमानात दहशत

इस्लाम कबूल करा, माथेफिरूची विमानात दहशत
मुंबई-दिल्ली विमानात प्रवाशांना धमकावले

www.24taas.com, मुंबई

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानातील प्रवास गुरुवारी प्रवाशांसाठी भयंकर दहशतीचा आणि कमालीचा तणावग्रस्त ठरला. विमानाने उड्डाण केल्यावर एक तासाने थरारनाट्य सुरू झाले.

विमान जयपूरच्या आकाशात असताना अचानक पठाणी वेश घातलेला एक मुस्लिम माथेफिरू उठला व इस्लाम कुबूल करो, अशा घोषणा देऊ लागला. त्याच्या त्या कृत्याने सारेच प्रवासी हबकले आणि विमानाचे अपहरण होण्याच्या भीतीने त्यांची पाचावर धारण बसली.

इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी धाडस करून माथेफिरूला ताब्यात घेतले आणि सुरक्षा संस्थांच्या हवाली केले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वाचस सोडला. मुरसलीम शेख असे त्याचे नाव आहे.

या थरारक नाट्याचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या प्रवाशाने सांगितले की, २८ ए सीटवर बसलेला शेख अचानक उठला व २९ ए सीटवरील वृद्ध महिलेला शिवीगाळ करू लागला. हवाईसुंदरीने त्याला शांत बसायला सांगितल्यावर त्याने तिला थप्पडही लगावली. नंतर तो जास्तच चवताळला व सबको देख लुँगा असे ओरडू लागला. विमानाचे कर्मचारी व काही प्रवाशांनी अखेर शेख याला ताब्यात घेतले व या थरारनाट्याचा शेवट झाला. मात्र काही वेळ प्रवासी प्रचंड तणावाखाली होते.

First Published: Friday, November 9, 2012, 19:07


comments powered by Disqus