नाहूर येथे टायर कंपनी गोदामाला आग, दोन जखमी, Nahur in fire at the tire Storage Godowns, two injure

नाहूर येथे टायर कंपनी गोदामाला आग, दोन जखमी

नाहूर येथे टायर कंपनी गोदामाला आग, दोन जखमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सीईएटी टायर कंपनीला आग, आगीने घबराट ।
नाहूर येथील सीईएटी टायर कंपनी गोदामाला आग ।
आगीमध्ये दोन जण जखमी ।
अग्नीशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी ।

नाहूर स्टेशनजवळ सीईएटी टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत दोन जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या आणि ६ बंब दाखल झाले आहेत. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आगीच्या धुरामुळे नाहूर स्थानकावर लोकल थांबवणं बंद केलं आहे.

टायर कंपनीच्या रॉ मटेरिअलला ही आग लागली आहे. टायर कंपनी असल्याने आग वेगाने भडकत आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आग भडकत असल्याचं सांगण्यात येत आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Sunday, February 23, 2014, 19:11


comments powered by Disqus