नारायण राणेंनाही `एमसीए` अध्यक्षपदाचे वेध!, narayan rane also interested in MCA election

नारायण राणेंनाही `एमसीए` अध्यक्षपदाचे वेध!

नारायण राणेंनाही `एमसीए` अध्यक्षपदाचे वेध!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘एमसीए’ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेते इच्छुक असताना आता उद्योगमंत्री नारायण राणेही या स्पर्धेत उतरण्याची शक्यता निर्माण झालीय. आपण ‘एमसीए’ची निवडणूक लढलो, तर ती अध्यक्षपदासाठी लढू, उपाध्यक्षपदासाठी नव्हे, असं राणेंनी सांगून टाकलंय.

यापूर्वीच शरद पवारांना आव्हान देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरले होते. त्यानंतर या निवडणुकीत पवार विरुद्ध मुख्यमंत्री असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण, मध्येच भाजप नेते गोपीनाथ मुंडेही पॅड बांधून मैदानात उतरले. मुंडेंनी स्टायलो क्लबचं प्रतिनिधीत्व स्वीकारलं असून क्लबकडून मुंडे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळतेय.

दुसरीकडे, मनसेचे नितीन सरदेसाईसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पारशी झोराष्ट्रीयन क्लबकडून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यातच आता नारायण राणेंनीही एमसीए निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केल्यानं या निवडणुकीतली रंगत आणखीनच वाढलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Friday, September 20, 2013, 19:29


comments powered by Disqus