Last Updated: Saturday, September 22, 2012, 10:53
www.24taas.com, नवी दिल्लीFDIला विरोध करून तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांनी राजीनामे दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नव्या नेत्यांना केंद्रात जाण्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, यात नव्या दमाच्या चेह-यांना संधी मिळणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह गुरुदास कामत, विलास मुत्तेमवार यांचे स्थान पक्के असल्याचे मानले जात आहे. शिवाय नव्या फेरबदलात राष्ट्रवादी काँग्रेसला एक राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) मिळू शकते.
तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्याने रेल्वेमंत्रीपदासह सहा मंत्रिपदे रिक्त झाली आहेत. रेल्वे खाते काँग्रेस स्वत:कडेच ठेवणार असल्याचे संकेत आहेत. जयराम रमेश वा गुलाम नबी आझाद यांच्याकडे ते सोपवले जाईल. सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल, वीरप्पा मोईलींची खातीही बदलली जाऊ शकतात.
First Published: Saturday, September 22, 2012, 10:53