राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न , Narayan Rane of Congress to try to change minds

नारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

नारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.

राणेंची नाराजी काय आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. पुन्हा दोन दिवसांनी मुख्यमंत्री राणेंशी चर्चा करणार आहेत, त्यानतर राणेंची नाराजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस दूर करू शकले नाही तर राणे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतरही सरकारच्या कामाची गती सुधारलेली नाही, अनेक निर्णय प्रलंबित आहेत. यातच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री बदलला जाईल अशी शक्यता होती. राणेंना काँग्रेसने पक्षात घेताना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, ते पाळलं गेले नाही. या सगळ्यामुळे राणे नाराज आहेत.

तर दुसरीकरडे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्री प्रचंड अस्वस्थ झालेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. योजनांना निधी मिळत नसल्यानं जनतेमध्ये रोष आहे. संजय गांधी निराधार योजना, ओबीसी शिष्यवृत्ती, ठिबक सिंचन अनुदान, पीक कर्ज योजनांचा निधी थकलाय. कर्ज काढा, पण योजनांसाठी पैसे द्या, अशी मागणी अस्वस्थ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 23:04


comments powered by Disqus