Last Updated: Sunday, January 6, 2013, 22:53
www.24taas.com, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वाची बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह सर्व मंत्री याला उपस्थित राहतील. यात दुष्काळावर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे. मात्र त्याच बरोबर मंत्रिमंडळ फेरबदलांबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते.
First Published: Sunday, January 6, 2013, 22:53