Last Updated: Thursday, February 7, 2013, 21:00
www.24taas.com, मुंबईMMRDA ची श्वेतपत्रिका काढण्याच्या मुद्दावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा टार्गेट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात चिमटा काढला आहे.
MMRDA ची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा करुनही मुख्यमंत्र्यांनी अद्यापही श्वेतपत्रिका काढली नसल्याचं राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी म्हटलं. मुख्यमंत्री आपला शब्द पाळणारे नेते आहेत असं सांगत राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्याना श्वेतपत्रिका काढण्याची आठवण करून दिली.
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरुन काँग्रेसने राष्ट्रवादीला खिंडीत पकडलं होतं. तर आता MMRDA च्या श्वेतपत्रिकेच्या मुद्दावरुन राष्ट्रवादी मुख्यमंत्री आणि काँग्रेसला खिंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.
First Published: Thursday, February 7, 2013, 21:00