मीरा-भाईंदर राष्ट्रवादीची सत्ता, मनसेची साथही राष्ट्रवादीलाच , ncp win mira bhayendar corporation election

मीरा-भाईंदर राष्ट्रवादीची सत्ता, मनसेची राष्ट्रवादीला साथ

मीरा-भाईंदर राष्ट्रवादीची सत्ता, मनसेची राष्ट्रवादीला साथ
www.24taas.com, मुंबई

मीरा भाईंदरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅटलिन परेरा यांची निवड झाली आहे. मीरा-भाईंदर मध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्रिशंकू अवस्था झाली होती.

कोणालाच बहुमत नसल्याने सत्ता कोण काबीज करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुजन विकास आघाडी, मनसे आणि एका अपक्षाची साथ मिळाली आहे.

उपमहौपरपदासाठी सध्या निवडणूक सुरू आहे. ही निवडणुक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळी लढली होती. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने बराच जोर लावला होता.

First Published: Tuesday, August 28, 2012, 12:41


comments powered by Disqus