Last Updated: Tuesday, October 15, 2013, 16:17
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशींसंदर्भात घडलेल्या अपमाननाट्यानंतर आता राष्ट्रवादीला जोशी सरांचा पुळका आलाय.
वडिलधाऱ्या माणसांना हाकलून लावण्याची शिवसेनेची पद्धतच असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केलीय. काम संपल्यानंतर फेकून देणं शिवसेनेचं तत्व असल्यामुळंच शिवसेनेच्या नेतृत्वानं मनोहर जोशींना बाजूला फेकलं असल्याची टीका मलिक यांनी केलीय.
याआधी एप्रिल २०१४मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी मनोहर जोशींनी प्रयत्न सुरू केले होते. त्याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र आता शिवाजी पार्कवरील नाट्यानंतर आता जोशी सर काय करतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 15, 2013, 16:17