Last Updated: Wednesday, October 31, 2012, 10:25
www.24taas.com, मुंबईहार्बर मार्गावरील लोकल 10 डब्यांच्या होणार आहेत. याचा प्रवाशांना दुहेरी फायदा होणार आहे. अतिरीक्त डब्यामुळं प्रवासी संख्यातर वाढणारच आहे. शिवाय लोकलचा वेगही आता वाढणार आहे.
जास्तीचा जोडण्यात येणारा डबा मोटरकोच असणार आहे. त्यामुळं लोकलचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. सध्या हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेल प्रवासाला 77 मिनिटं लागतायेत.जादा डबे जोडल्यामुळं हा वेळही कमी होणार आहे.
जादा मोटरकोच जोडल्यास सीएसटी पनवेल प्रवास 65 मिनिटांचा होणार आहे. त्यामुळं हार्बर मार्गावरचा प्रवास वेगवान होणार आहे.
First Published: Wednesday, October 31, 2012, 10:25