मुंबईमध्ये नवा किलर! New Killer in Mumbai

मुंबईमध्ये नवा किलर!

मुंबईमध्ये नवा किलर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईमध्ये नवा किलर आलाय. दररोज 19 लोकांचे बळी तो घेतोय. वर्षभरात 6 हजार 921 लोकांचा जीव त्यानं घेतलाय, हा सिरीयल किलर आहे टीबी अर्थात क्षयरोग...

केवळ टीबीच नव्हे, तर डेंग्यू आणि कॉलरा या रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांचे आरोग्यच धोक्यात आलंय... प्रजा फाऊंडेशननं मुंबईच्या आरोग्याबाबत प्रकाशित केलेल्या ताज्या अहवालात या किलर रोगांबाबत ही धक्कादायक माहिती देऊन धोक्याची घंटा वाजवलीय. तर दुसरीकडे मुंबईकरांच्या आरोग्याबाबत नगरसेवक किती उदासिन आहेत याचं वास्तव चित्रही उजेडात आणलंय...

गेल्या वर्षभरात २२७ पैकी तब्बल १३८ नगरसेवकांनी आरोग्याबाबत एकही प्रश्न महापालिकेत उपस्थित केलेला नाही. मुंबई शहराला टीबी, डेंग्यू, कॉलराचा विळखा पडत असताना नगरसेवकांना मात्र त्याचं सोयरसूतक नसल्याचं समोर येतंय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 21:08


comments powered by Disqus