एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल, NFDC come in to marathi cinema

एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल

एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि एनएफडीसी यांच्यात मराठी चित्रपटनिर्मितीसाठी करार करण्यात आला. या करारानुसार मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा सांस्कृतीक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी केली.

आतापर्यत राज्य सरकार फक्त मराठी चित्रपट निर्मात्यांना अनूदान देत असे, पण आता या करारानुसार राज्य सरकारने आपले पाऊल मराठी चित्रपटसृष्टीत टाकले आहे.

६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ११ मराठी कलाकारांनी बाजी मारली होती. त्यात दिग्दर्शक, निर्मात्यांचा देखील समावेष होता. यांना ५१ हजार रूपये देऊन सन्मानित करण्यात आले होते. पण आता प्रथमच राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी चित्रपटांनी वर्चस्व गाजवले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात देवतळे यांच्या हस्ते या ११ कलाकारांना पुरस्कारप्राप्त रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013, 17:14


comments powered by Disqus