माझी टीका गुजरात्यांवर नाही, तर मोदींवर- नितेश राणे Nitesh Rane still firm on his statement

माझी टीका गुजरात्यांवर नाही, तर मोदींवर- नितेश राणे

माझी टीका गुजरात्यांवर नाही, तर मोदींवर- नितेश राणे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गुजराती समाजाबाबत ट्विटरवरुन केलेल्या टीपण्णीवर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे ठाम आहेत. गुजराती समाजाबाबत काही आक्षेपार्ह विधान ट्विटरवर केलं नसल्याचा खुलासा राणे यांनी केलाय.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ट्विटरवरील विधानाबात स्पष्टीकरण दिलं. आपल्य़ा विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. शिवाय मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. मोदी समर्थकांनी गुजरातमध्ये जावं असा इशाराही त्यांनी पुन्हा दिला. तसंच गुजरातपेक्षा विकासामध्ये महाराष्ट्रच अव्वल असल्याचं नितेश यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे नितेश राणे यांचं ट्विटरवरील विधान तपासून कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलीय. तर नितेश राणे यांनी आपलं ट्विट काढून टाकलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 3, 2013, 17:00


comments powered by Disqus