Last Updated: Tuesday, October 15, 2013, 10:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकल ट्रेनमध्ये सर्रास दिसणा-या बंगाली बाबा आणि भोंदूबाबांच्या जाहिराती आता गायब होण्याची चिन्हं आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करायला सुरुवात केलीय. महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांचा सुगावा या कारवाईमधून लागतो का, हा प्रयत्नही रेल्वे पोलिसांचा असणार आहे.
झटपट श्रीमंत व्ह्यायचंय, भेटा आम्हाला
प्रेम प्रकरणात यश मिळत नाही, आम्हाला भेटा
नोकरी लागत नाही, आमच्याशी संपर्क साधा
मुल होत नाही, तुमची चिंता दूर करू
अशा जाहिराती अनेक ठिकाणी पहायला मिळतात. रेल्वेचे डबे तर अशा भोंदूबाबांच्या जाहिरातींनी रंगलेले असतात. या जाहिराती पाहून अनेक जण या बंगाली आणि भोंदू बांबाना बळी पडतात. आता मात्र या भोंदूबाबांची गय नाही. अशा भोंदूबाबांना शोधून त्यांच्यावर कारवाई करायला पोलिसांनी सुरुवात केलीय.
अशा भोंदू बाबा आणि बंगाली बांबाच्या फसव्या जाहिरातींना बळी पडणा-यांमध्ये महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे. आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांचं कर्मकांडं समोर आल्यानंतर पोलीस जास्त खबरदारी घेतायत. एवढंच नाही तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा काही सुगावा या भोंदू बाबांच्या विरोधातल्या मोहिमेतून लागतोय का? यासाठीही रेल्वे पोलिसांनी ही मोहीम सुरु केलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 15, 2013, 10:43