Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:43
www.24taas.com, अमित जोशी, झी मीडिया, मुंबईमुंबईकरांनो याही वर्षी रेल्वेने तुम्हाला ठेंगा दाखवलाय. रेल्वे अर्थसंकल्पात 72 नवीन लोकल सेवा सुरु करणार असं जाहीर करण्यात आलं होतं.मात्र प्रत्यक्षात यापैकी निम्म्या सेवासुद्धा सुरु करण्यात आलेल्या नाहीत.
गेल्या वेळच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मुंबईसाठी 72 नव्या लोकल सेवांची घोषणा केली होती.
72 पैकी पश्चिम रेल्वेच्या वाट्याला 32 आणि मध्य रेल्वेसाठी 40 सेवांची घोषणा करण्यात आली होती
यापैकी पश्चिम रेल्वेने 16 सेवा सुरु केल्या तर मध्य रेल्वेने 18 सेवा सुरु केल्या. म्हणजेच पश्चिम रेल्वेच्या 14 सेवांचा आणि मध्य रेल्वेच्या 22 सेवांचा पत्ता नाही.
थोडक्यात घोषणा झालेल्या सेवांपैकी निम्म्या सेवा मुंबईत सुरुच झालेल्या नाहीत.
पश्चिम रेल्वेने 38 लाख तर मध्य रेल्वेने 40 लाख लोक रोज प्रवास करतात. सध्याची जीवघेणी गर्दी पाहिली तर लोकलच्या फे-या वाढवण्याची किती गरज आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 5, 2014, 11:43