Last Updated: Friday, November 29, 2013, 15:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे कोणत्याही धर्मांध शक्तींचा हात नाही, असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी हायकोर्टात दिलंय.
त्याचबरोबर हे प्रकरण एनआयएच्या तपासायोग्य नाही, त्यामुळं या प्रकरणाचा तपास एनआयकडे देता येणार नाही असंही पुणे पोलिसांनी कोर्टाला सांगितलंय.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल पुणे पोलिसांनी कोर्टापुढं सादर केला. केतन तिरोडकर यांनी दाभोलकर यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपवावा अशी याचिका केली होती.
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान पुणे पोलिसांनी ही माहिती कोर्टाला दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 29, 2013, 15:45