Last Updated: Thursday, January 10, 2013, 20:54
www.24taas.com, मुंबईमनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेच्या उद्याच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. मात्र दुसरीकडे मोर्चाबाबत तोडगा काढण्यासाठी पोलिसांशी बोलणी सुरू असल्याचं मनसे राज्य परिवहन वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलंय.
मनसेनं कर्मचा-यांच्या सोयीसुविधांसाठी अनेक मागण्या केल्या असून या मागण्यांवर ठाम असल्याचंही अभ्यंकरांनी सांगितलंय. संघटनेचे सदस्य असलेल्या राज्यातल्या हजारो एसटी कर्मचा-यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन सुरू केलंय.
उद्या आझाद मैदानावर मनसेनं मोर्चाचं आयोजन केलंय. त्यामुळं मनसे आणि सरकारमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. मनसेची कामगार युनियन, नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेनं हे आंदोलन पुकारलंय. यात अंदाजे 35 हजार कर्मचारी सहभागी झाले असल्यानं अनेक ठिकाणी एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. दुपारनंतर या आंदोलनाचा आणखी मोठा फटका प्रवाशांना बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून 12 जानेवारीपर्यंत हे आंदोलन चालणार असल्यानं आणखी 3 दिवस प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, January 10, 2013, 20:54