Last Updated: Thursday, August 9, 2012, 20:17
मुंबईतील साडेपाच हजार इमारतीना ओसी मिळाली नसल्याची माहीती मुख्यमंत्र्यानी विधीमंडळात दिली होती.मात्र मुंबई महापालिकेकडे किती इमारतीना ओसी मिळाली आहे? किती इमारतीना ओसी दिलेली नाही यांची माहिती पालिकेकडे नोंदच नसल्याच उघड झालंय.पालिकेन दिलेल्या माहीती अधिकारातना हे सत्य बाहेर आलंय.
मुंबईत किती इमारती आहेत.किती इमारतीना ओसी मिळालेली आहे.किती इमारतीकडे ओसी नाही. मुंबई महापालिकेकडे याची माहितीच नाही आहे. पालिकेचं हे सत्य माहिती अधिकारातूना उघड झालंय. पालिकेकडून ही माहिती मिळत नसल्यामुळे नवीन इमारती प्रमाणे 15 वर्ष होऊनही इमारतीना ओसी न मिळाल्याने रहिवाशांना सद्यस्थिती कळत नाही आहे.त्यामुळे पालिका ही माहीती लपवत असल्याचा आरोप माहीती अधिकारातील कार्यकर्त्यांनी केलाय.
पालिकेकडे हा डेटा बेस नसल्याच पालिका आयुक्ततांनी मान्य केलंय. माहीती अधिकारातील कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आहे. जलविभाग ओसी नसलेल्या इमारतींच्या पाण्याचे दर दुप्पट घेत असल्यामुळे पालिकेला ओसी नसलेल्या इमारतीची खरी माहिती मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत किती इमारती आहेत? किती इमारतीना ओसी मिळालेली आहे? याची माहिती पालिका वेब साईटवर जाहीर करणार आहे.
First Published: Thursday, August 9, 2012, 20:17