मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला पुन्हा एकदा धक्का No tender for Mumbai trans Harbour Link

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला पुन्हा एकदा धक्का

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला पुन्हा एकदा धक्का
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतला महत्वाकांक्षी सी लिंक प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी-चिर्ले सी लिंकला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या प्रकल्पाची निविदा भरण्यासाठी एकही कंपनी पुढे आली नाही.

सुमारे ९३६० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी एमएमआरडीएनं निविदा काढल्या होत्या. ५ ऑगस्ट ही निविदा भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र एकाही कंपनीनं या प्रकल्पासाठी उत्सुकता दाखवलेली नाही. नवी मुंबई विमानतळाच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मुंबईतून नवीन विमानतळावर पोहचण्यासाठी या सी लिंकचा वापर होणार आहे. तसंच या सी लिंकवरुन गोवा महामार्गावरही लवकर पोहोचता येणार आहे.

एमएमआरडीएनं आता हा प्रकल्प स्वतःच राबवण्याचा निर्णय घेतलाय. असं असलं तरी सरकारी पातळीवर निर्णय प्रक्रिया लक्षात घेता प्रकल्पाचं काम सुरु व्हायला आणखी एक वर्ष लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 5, 2013, 23:38


comments powered by Disqus