Last Updated: Wednesday, April 10, 2013, 09:39
www.24taas.com, मुंबईबुलढाणा जिल्ह्यातले चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी उडवलेल्या पैशांवर अजब खुलासा दिलाय. वाढदिवसानिमित्तानं उडवलेले पैसे दुष्काळग्रस्तांना दिल्याची सारवासारव केली.
बोंद्रेचा हा कारनामा झी 24 तासनं जनतेसमोर आणल्यानंतर त्यांनी याबाबत थातुरमातूर उत्तर दिलंय. उडवलेल्या पैशातून दुष्काळग्रस्तांसाठी टँकरची मदत केल्याचं राहुल बोंद्रे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत नोटांचा पाऊस पाडण्यात आलाय. माजी नगरसेवकाच्या वाढदिवसी या नोटा उधळण्यात आल्या आहेत.
First Published: Tuesday, April 9, 2013, 23:56